सांगोला :-सांगोला विधानसभा मतदार संघाचे आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी मस्साजोग जि.बीड येथे जावून स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यां यावेळी स्व.संतोष देशमुख यांच्या अमानवी हत्येप्रकरणातील सर्व दोषींना कडक शिक्षा व्हावी अशी राज्य सरकारकडे मागणी केली.
संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहू, अशा शब्दांत देशमुख कुटुंबियांना आमदार डॉ . बाबासाहेब देशमुख यांनी आश्वस्त केलं. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.