कोळा येथील दीपक आबा सायन्स कॉलेजचे काशिलिंग होनमाने यांची लेफ्टमनपदी निवड…

सांगोला तालुक्यातील कोळा येथील डॉ पतंगराव कदम बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित दीपक आबा साळुंखे पाटील सायन्स कॉलेजचे एनसीसी विभाग प्रमुख जुनोनी गावचे काशिलिंग शिवाजी होनमाने यांची ३८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर मुख्य कमांडो ऑफिसर कर्नल राजेश गजराज व कमांडो विक्रम जाधव सुभेदार अरुण ठाकूर यांच्यावतीने वर्दीला तीन स्टार लावून प्रमोशन देऊन सन्मान करून लेफ्टमनपदी निवड करण्यात आली आहे या निवडीने जुनोनी कोळा पंचक्रोशीतून सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संस्थापक दीपकराव माने, सचिव अमोल माने, संचालक यांनी अभिनंदन करून त्याचे कौतुक केले आहे.
नूतन लेफ्टनंट काशिलिंग होनमाने शेतकरी कुटुंबात जन्म झाला वडील शिवाजी होनमाने शेतकरी असल्याने परिस्थिती हालाखीची होती त्यांचे प्राथमिक शिक्षण पहिली ते पाचवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेंदवस्ती जुनोनी, पाचवी ते दहावी नारायण तात्या पाटील यांच्या जुनोनी महाविद्यालय जुनोनी तर दहावी ते बारावी सांगोला विद्यामंदिर सांगोला, बीएससी पर्यंत शिक्षण भाई गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे तसेच एम सी ए सद्गुरु गाडगे महाराज शिक्षण संस्था कराड येथे झालेच्या गरिबीतून शिक्षण घेऊन लेफ्टमनपदी पदी निवड झाल्याने जुनोनी गावाला एक बहुमान मिळाला असल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन कौतुक होत आहे..