उत्कर्ष विद्यालय इयत्ता दहावीची पालक सभा संपन्न

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालय सांगोला येथे बुधवार 12 जुलै 2023 रोजी इयत्ता दहावीची शिक्षक पालक सभा संपन्न झाली.
सर्व पालकांना प्रास्ताविकामधून सौ.निर्मला भोसले यांनी वर्षभरातील इयत्ता दहावीचे वार्षिक नियोजन सांगितले. तसेच वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांची प्रत्येक विषयाची घटक निहाय तयारी कशा पद्धतीने करून घेतली जाणार आहे याचे उत्तम नियोजन सांगण्यात आले .याप्रसंगी इयत्ता दहावीतील दोन पालक प्रतिनिधी श्री सुनील सावंत तसेच सौ. तबस्सुम मणेरी यांची पालक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांच्या काही सूचना, अडचणी यावर चर्चा झाली .
त्यानंतर विद्यार्थ्यांचा आहार कसा असावा यावर डॉ.सौ सुपर्णा केळकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मुख्याध्यापक श्री सुनील कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शन झाले. आभार प्रदर्शन सौ.क्रांति गंगथडे यांनी केले. या सभेसाठी मा. पर्यवेक्षक श्री मिसाळ सर तसेच इयत्ता दहावीचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
One attachment • Scanned by Gmail



