सांगोला तालुका

पेरणी योग्य पाऊस झाल्यावरच बीज प्रक्रिया करून पीक पेरणी करावी – शिवाजी शिंदे

सांगोला – सांगोला तालुक्यात आगामी सन- २०२४ च्या खरिप हंगामामध्ये सुमारे  ३७ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर खरिप पिकांची पेरणी अपेक्षित आहे त्याअनुषंगाने कृषि विभागाकडून बियाणे, रासायनिक खते व कीडनाशके यांचे नियोजन केले आहे.शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा झाल्यावरच किंवा ८०-१०० मिमी पाऊस झाल्यावर खरीप पिकांची बीजप्रक्रिया करूनच बियाणाची पेरणी करावी. बियाणे,खते,किटकनाशकाबाबत काही आडचण आल्यास कृषि विभागाशी संपर्क साधावाअसे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.
दरवर्षी मे महिना संपताना शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे वेध लागतात तत्पूर्वी सांगोला तालुक्यात रब्बी ज्वारीची काढणी मोडणी कामे झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कडक उन्हाळ्यात दुपारनंतर विश्रांती घेऊन टप्प्या-टप्प्याने खरीप हंगाम पेरणीपूर्व शेतीची ट्रॅक्टर ,बैला करवी नांगरणी करून मशागतीची कामे काही भागात उरकली तर काही ठिकाणी अंतिम टप्प्यात आहेत द सध्या सांगोला तालुक्यात वादळी वारे मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडू लागला आहे मात्र शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी वेळेत  पेरणी योग्य पाऊस पडण्याची अशा लागून राहिली आहे.सांगोला तालूक्याचे सरासरी खरीप हंगाम क्षेत्र २२ हजार ७१९ हेक्टर आहे. सन २०२१मध्ये खरीप मध्ये २९ हजार ‌८४८ हेक्टर क्षेत्रावर  सन २०२२ मध्ये ३१ हजार ९५२ हेक्टर क्षेत्रावर तर गतवर्षी सन २०२३ मध्ये २७ हजार ७०४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली होती. आगामी खरिप हंगामामध्ये  ३७ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर खरिप‌ पिकांची पेरणी अपेक्षित धरुन तालुका कृषी विभागामार्फत नियोजन केले आहे.
खरिप २०२४ प्रस्तावित पिक निहाय क्षेत्र पुढीलप्रमाणे-बाजरी- १५ हजार हेक्टर, मका- १७ हजार ५०० हे,सुर्यफुल -२ हजार हेक्टर,तुर-१२,५० हेक्टर,उडीद- ७५० हेक्टर,मुग- ५०० हेक्टर,भुईमुग – ५०० हेक्टर,सोयाबिन – ३०० हेक्टर,कापुस – २५० हेक्टर,मटकी- १२५ हेक्टर असे एकुण सुमारे ३७ हजार ९७५  हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे
 खरीप हंगाम तालुक्यासाठी खत निहाय मंजुर आवंटन पुढिलप्रमाणे-युरिया- ५,९८२ मे. टन ,एस.एस.पी.- २,०९८ मे टन,एम.ओ.पी- ७७७ मे टन,डि.ए.पी.- १,९२४ मे टन,एन.पि.के.- ५८९५ मे टन असे एकूण १६,६७६ मे.टन रासायनिक खताचे आवंटन मंजुर झाले आहे शेतकऱ्यांनी आधिकृत दुकानदार यांचेकडूनच बियाणे ,खते व किटकनाशके खरेदी करून पक्के बिल घ्यावे. बॕग वरील किंमतीपेक्षा जादा रक्कम देऊ नये. बियाणे बॕग व लेबल जपुन ठेवावे. गुणवत्ता नियंत्रणासाठी तालुका स्तरीय भरारी पथक तसेच तक्रार निवारण कक्षाची स्थापना केली आहे –
शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!