सांगोल्याच्या पश्चिम भागातील अनेक गावातील पाणंद रस्त्याची दुरावस्था….
सांगोला तालुक्यातील कोळा,जुनोनी डोंगर पाचेगाव किडबिसरी कोळे कराडवाडी कोंबडवाडी तिप्पेहळी गौडवाडी या भागातील वाड्यावर जाणाऱ्या कित्येक गावांत शेतशिवारात जाण्यासाठी पाणंद रस्ते आहेत. या रस्त्यांची महसूल दप्तरी नोंद आहे. मात्र, दुरुस्ती व देखभाली अभावी बहुतांश पाणंद रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. संबंधित विभागाने शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन तातडीने पाणंद रस्त्या कडे लक्ष देऊन दुरुस्त करणे गरजेचे बनले आहे अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे.
ग्रामीण भागात ऐन खरीप हंगामात या पाणंद रस्त्यांची अवस्था फार बिकट होते. आता पावसाळा तोंडावर असतानाही महसूल विभागाने पाणंद रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ते अंत्यत महत्त्वाचे असतात. मात्र, शेतात जाण्यासाठीचा मुख्य रस्ता असलेल्या पाणंद रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने या खोलगट रस्त्यात पाणी, चिखल साचून शेतकऱ्यांची गैरसोय होते. अनेकवेळा गाव कुसालगत जाण्यासाठी शेतकऱ्यांना दोन, तीन किलोमीटर अंतरावरून जावे लागते. कित्येक पाणंद रस्त्यांचे रोजगार हमी योजनेतून अकुशल माती काम झाले आहे. काही गावानजिकचे रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले आहेत. हे रस्ते पायवाट म्हणून अजूनही वापरले जात आहेत. पाणंद रस्त्याची पावसाळ्यात फार दयनीय अवस्था होत आहे.
शेतकऱ्यांची शेती असल्याने शेतमालाची ने-आण करणे, पेरणी करण्याकरिता मजूर नेणे, गाडीने किंवा ट्रॅक्टरने शेती उपयोगी अवजारे व खत किंवा तत्सम साहित्य पोहोचवणे याकरिता पावसाळ्यात पाणंद रस्ता चिखलमय असल्याने शेतकऱ्यांना फार अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकरी शासन व प्रशासनाकडे वारंवार पाणंद रस्ता दुरुस्तीसाठी प्रस्ताव देत असतात. मात्र याकडे हेतु परस्सर सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचे शेतकरी बांधवांकडून नेहमीच ऐकावयास मिळते. त्यामुळे ग्रामीण भागाला मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी पाणंद रस्त्याकरिता निधी उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. सर्व पाणंद रस्त्यांचे नूतनीकरण करून पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी वर्गातून केली जात आहे.
डोंगर पाचेगाव भागात डोंगरी भाग असल्यामुळे पानंद रस्त्याची अवस्था खूप खराब झाली आहे यामध्ये सटवाई मळा घोडके मळा घोडके वस्ती घाण धरा रस्ता रोड घोडके गिड्डे मंडळी वस्ती या ठिकाणी जाणाऱ्या पानांदरस्त्याची अवस्था फार वाईट झाली आहे तातडीने उपाययोजना करून रस्ता चांगला होणे गरजेचे आहे.
~ शहाजी घुटुकडे, शेतकरी पाचेगाव बुद्रुक