शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा.

सांगोला (प्रतिनिधी):-सांगोला शहरातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने कारगिल विजय दिनाचा 25 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त सुरुवातीस शहीद अशोक कामटे यांच्या प्रतिमेचे पूजन मकरंद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी कारगिल विजय दिनानिमित्त नीलकंठ शिंदे सर यांनी विचार व्यक्त करून या दिनाचे महत्त्व सांगितले.
यावेळी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चारुदत्त खडतरे यांनी केले. कार्यक्रमाचे सांगता वंदे मातरम गीताने करण्यात आली.यावेळी अशोक कामटे संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते