sangola
*अनेक दिवसांपासून रखडलेल्या चोपडी-चिंध्यापीर रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात*
नाझरा(वार्ताहर):- गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या चिंद्यापीर- चोपडी रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे.हातीद,पाचेगाव, गौडवाडी, उदनवाडी राष्ट्रीय महामार्गापर्यंत आटपाडी कडून येणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग अत्यंत जवळचा आहे. गेली चार-पाच वर्ष या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली होती पावसाळ्यात अनेक छोटे-मोठे अपघात या रस्त्यावर घडत होते या रस्त्यावर अनेक ठिकाणी दीड दोन फुटांचे खड्डे असल्यामुळे छोट्या-मोठ्या वाहनधारकांची या रस्त्यावरून जाताना कसरत होत होती. अनेक दिवसांपासून या रस्त्याची येथील ग्रामस्थांकडून मागणी होत होती प्रशासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करत अखेर या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
खरंतर चोपडीकडे येणारा कोणताही रस्ता सुस्थितीत नाही बलवडी पाटी ते चोपडी या रस्त्याची ही प्रचंड दुरावस्था झाली आहे.उदनवाडी मार्गे चोपडीला येणाऱ्या रस्त्याची ही दुरावस्था झाली आहे.गेल्या तीन वर्षापासून काम सुरू असलेल्या चोपडी नाझरा रस्ता आत्ता कुठे पूर्णत्वास येत आहे.अशातच चोपडी चिंध्यापीर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने चोपडीकरांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
दर पौर्णिमेला म्हसवड, भोजलिंग, खरसुंडी या ठिकाणी सांगोला तालुक्यातील झोपडीच्या दक्षिणेकडील गावातील असंख्य भाविक भक्त या रस्त्यावरून जात असतात त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने जोर धरत होती. मागणीची पूर्तता होत असल्याने या भागातील वाहनधारक नागरिकांकडून प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. चिंध्यापीर पासून शिवाजीनगर पर्यंत हा रस्ता साई सिध्द कन्स्ट्रक्शन जुनोनी या कन्स्ट्रक्शन यांच्याकडून केला जात आहे.
एक ते दीड महिन्यामध्ये चिंध्यापिर पासून चोपडी येथील शिवाजीनगर पर्यंत असणारा हा रस्ता आम्ही पूर्ण करत आहोत.
सदर रस्त्याचे काम अतिशय व्यवस्थितपणे व उत्कृष्टपणे करणार आहोत.रस्त्याचे दुरुस्तीचे काम करत असताना या रस्त्यावरून असंख्य वाहनधारक जाताना दिसत आहेत. यावरून हा रस्ता प्रचंड रहदारीचा असल्याचे समजते. वाहनधारकांची व प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत एक ते दीड महिन्यात हा रस्ता पूर्ण करणार आहे.*
—— *अमृत पाटील*
*साई सिद्ध कन्स्ट्रक्शन जुनोनी*