उपसरपंच पोपट यादव ,पत्रकार दशरथ बाबर यांनी अथक परिश्रमातून सांगोला( चोपडी मार्गे )आटपाडी दोन एसटी बसेस केल्या सुरू
सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील चोपडी हे गाव लोकसंख्येने मोठे असून प्रवासी व विद्यार्थी यांना आटपाडी व सांगोला या ठिकाणी ये जा करण्यासाठी मोठी गैरसोय होत होती. ही अडचण लक्षात घेऊन उपसरपंच पोपट यादव ,पत्रकार दशरथ बाबर यांनी गेल्या तीन महिन्यापासून सांगोला एसटी आगार प्रमुख विकास पोपळे यांच्याशी पत्रव्यवहार करून व वारंवार भेट घेऊन सांगोल्याहून सकाळी 11 वाजता व दुपारी 3: 30 वाजता, सांगोल्याहून चोपडीमार्गे आटपाडीकडे जाण्यासाठी एसटी बसची सोय उपलब्ध केली आहे .या बस सकाळी 11 वाजता सांगोल्याहून निघणार आहे.
ही गाडी सकाळी 12 वाजता चोपडी येथे पोहोचेल व परत चोपडी मार्गे सांगोल्याकडे मार्गस्थ होईल. दुपारी , सांगोल्याहून 3:30वाजता सोडण्यात येणारी एसटी बस 4:15 ते 4:30 या वेळेत चोपडी येथे पोहोचेल या दोन्ही बसेस चोपडी मार्गेच सांगोल्याकडे परत रवाना होतील, तरी प्रवासी व विद्यार्थी यांनी आपल्या महत्वाच्या कामासाठी एसटी बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आगारप्रमुख विकास पोपळे यांनी केले आहे.
14 मे पासून सुरू करण्यात आलेल्या सांगोला ते आटपाडी एसटी बसच्या चालक व वाहक यांचा सन्मान चोपडी गावचे उपसरपंच पोपट यादव, चेअरमन भिकाजी बाबर, राजू मेखले, बंडू मेखले ,विकास गिड्डे, नवनाथ खळगे ,संजीवा कांबळे ,तुकाराम बाबर, सचिन खळगे , शंकर केंगार गुरुजी, मान्यवर, ग्रामस्थ यांनी केला व एसटी वाहक चालक व प्रवासी वर्गाला शुभेच्छा व्यक्त केल्या.
गेल्या वीस पंचवीस वर्षांपूर्वी पासून चोपडी गावातील प्रवासी व विद्यार्थी वर्गांना एसटीच्या वाढीव तिकीट दराचा आर्थिक फटका बसत होता. तो वाढीव तिकीट दर कमी करण्यासाठी पत्रकार दशरथ बाबर व पत्रकार सुनील जवंजाळ सर यांनी सातत्याने प्रयत्न करून व अन्यायकारक वाढीव तिकीट दराच्या संदर्भात बातम्या प्रसिद्ध करून तिकीट दर निश्चित केला. गेल्या पाच ,वर्षापासून प्रवासी व विद्यार्थी वर्गाचे रोज दहा रुपये वाचवण्यात अखेर यश मिळाले. त्यामुळे एका विद्यार्थ्याचे वार्षिक 3 हजार रुपये इतकी मोठी बचत झाली. आहे .हे करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न मोलाचे ठरले आहेत. त्याचा फायदा आज अनेक प्रवाशांना व विद्यार्थी वर्गाला होत आहे व भविष्यातही होणार राहणार आहे. यापुढेही प्रवासी व विद्यार्थी वर्गाच्या सोयीसाठी अडचणीच्या प्रसंगी असेच प्रामाणिक प्रयत्न सुरू राहतील .