sangola
फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेजमध्ये दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न*
फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित , फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड नवी दिल्ली (सीबीएसई)तर्फे घेण्यात आलेल्या दहावी २०२३-२४ परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.यावेळी सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
इयत्ता दहावीतील प्रथम क्रमांक कुमारी ऋतुजा संतोष टिंगरे, द्वितीय क्रमांक प्रणिता रामचंद्र म्हारनुर, तृतीय क्रमांक कुमारी सलोनी प्रवीण गुंगे या सर्व विद्यार्थिनींना संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अमित रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, शाळेचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
फॅबटेक संस्थेचे अध्यक्ष श्री.भाऊसाहेब रुपनर, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अमित रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, शाळेचे प्राचार्य श्री.सिकंदर पाटील, ए.ओ.वर्षा कोळेकर, सुपरवायजर सौ. वनिता बाबर आदींसह सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण कोडक यांनी केले.