सांगोला तालुका

कडलास येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न 

सांगोला प्रतिनिधी – स्वराज्याचे धाकले धनी छात्रविर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन छावा ग्रुप व संभाजी ब्रिगेड संघटनेचेच्या वतीने करण्यात आले .
सकाळी ८ वाजता छत्रपती संभाजी महाराज मुर्तीला अभिषेक व पूजन  माजी सैनिक धनंजय गायकवाड व हणमंत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष प्रदीप मिसाळ पाटील , भारतीय जनता पक्षाचे नेते शिवाजीराव गायकवाड , कडलास गावाचे सरपंच दिगंबर भजनावळे, मा . उपसरपंच सुनील पाटील, पप्पू पाटील, राहुल पाटील, संग्राम गायकवाड, सचिन चव्हाण, आकाश ठोकळे, महेश माने, सुजित जाधव, सागर पाटील, शिवाजी ठोकळे,निलेश अनुसे व कडलास गावाचे समस्त ग्रामस्थ उपस्थित . सकाळी ९वाजता  संत तुकाराम महाराज विचार मंच शेजारी  रक्तदान शिबीर सुरुवात झाले
यावेळी शंभू प्रेमींनी शिबीरास गर्दी केली.  गेले अकरा वर्षांपासून छावा ग्रुप  संभाजी ब्रिगेड व समस्त ग्रामस्थ कडलास यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विविध उपक्रम राबवितात .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!