*फॅबटेक इंजिनिअरिंगचा माजी विद्यार्थी मेळावा “ऋणानुबंध २०२४” संपन्न*

सांगोला : विद्यार्थी कितीही मोठे झाले तरी आपली शाळा – महाविद्यालय अन् तेथील आठवणी नेहमी मनात घर करून असतात. याचा प्रत्यय सांगोला येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात आला. मुंबई,पुणे,बेंगलोर तसेच हैदराबादहून आलेले माजी विद्यार्थी महाविद्यालयाच्या आठवणीत अभियंते रमलेले दिसले.
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा ऋणानुबंध २०२४ उत्साहात पार पडला. त्यानिमित्त परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी महाविद्यालयाच्या आठवणीत हरवून गेले होते.
प्रारंभी माजी विद्यार्थी समन्वय प्रा.संजय पवार यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्याचे स्वागत करून फॅबटेक टेक्निकल कॅम्पस ची जडणघडण सांगून माजी विद्यार्थी हे कायमच फॅबटेक चे प्रेरणादायी राहिले आहेत असे सांगितले.
प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे म्हणाले की, महाविद्यालयाच्या जडणघडणीत तसेच वाटचालीत महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. महाविद्यालयाचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असून, त्यांनी महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेले परिश्रम हे अदभूत होते असे सांगून फॅबटेक च्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला.
ऋणानुबंध २०२४ चा महाविद्यालयाकडून प्रती वर्षाप्रमाणे या वर्षीचा उत्कृष्ट माजी विद्यार्थी म्हणून श्री.वेद परमार व श्री.सिद्धेश्वर केसकर याची निवड करण्यात आली.तसेच माधुरी यादव ,सुशांत घाटे ,अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी महाविद्यालयाविषयी मनोगतरुपी प्रेम व्यक्त केले.
हा माजी विद्यार्थी मेळावा ऋणानुबंध २०२४ संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर ,मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी प्राजक्ता रुपनर, यांच्या मार्गदर्शनाखाली व कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे,स्टुडन्ट डीन व संगणक विभाग प्रमुख डॉ.शरद पवार ,डीन अँकँडमीक डॉ .वागीशा माथाडा प्रा.टी. एन. जगताप,इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्रा.संदीप कदम,ए.आय.अँड.डी.एस.विभाग प्रमुख प्रा.तानाजी धायगुडे,प्रा.अविनाश सुर्यागन,प्रा.माऊली खडतरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.सूत्रसंचालन व आभार प्रा.प्रियांका पावसकर यांनी केले.