फॅबटेक फार्मसीच्या ०९ विद्यार्थ्यांची भरारी डीजीटल सोल्युशन्स मध्ये निवड
सांगोला येथील फॅबटेक शिक्षण संस्था संचलित फॅबटेक औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता भरारी डीजीटल सोल्युशन्स यांच्यातर्फे प्लेसमेंट ड्राइव्ह घेण्यात आली.
यामध्ये फॅबटेक फार्मसी च्या आदर्श राजगिरे, शितल हत्तळी, प्रतीक्षा मागाडे, मानसी कोरे, म्हल्लापा कांबळे, पद्मावती हत्तळी, श्रेया कामावरम, तेजश्री नवले व सिमरन नदाफ अशा ०९ विद्यार्थ्यांची भरारी डीजीटल सोल्युशन्स मध्ये पदवीधर जीवनविज्ञान प्रशिक्षणार्थी पदासाठी निवड झाली. याकरिता जवळजवळ ५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी करून मुलाखत दिली.
याकरिता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. भाऊसाहेब रुपनर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर व परिसर संचालक डॉ. संजय अदाटे यांनी प्राचार्य डॉ. संजय बैस व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सदर कॅम्पस इंटरव्यू घेण्यात प्रा. चेतन पतंगे व प्रा. श्रीनिवास माने यांचे सहकार्य लाभले.