सांगोला तालुक्यात अभूतपूर्व घटना
शेळीने एकाच वेळी पाच करडांना दिला जन्म

शेळीस जुळे किंवा तिळे जन्मलेले ऐकण्यात आले. मात्र, सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील एका शेतकऱ्याच्या उस्मानाबादी जातीच्या शेळीने चक्क पाच पिलांना जन्म दिला आहे. शेळीने एकाच वेळी पाच करडांना जन्म दिल्याची घटना घडल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे. शुक्रवार २६ जुलै जन्मलेले पाचही पिल्ले निरोगी आणि सुदृढ आहेत.
सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे एका शेळीने एकाच वेळी तब्बल पाच पिलांना जन्म दिला. ही वार्ता गावात पसरताच त्यांना बघण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील बिरा टकले यांच्या घरी शेळीने पाच पिलांना जन्म दिला. साधारणत: शेळी दोन किंवा तीन पिलांना जन्म देते, असे सांगितले जाते. काही ठिकाणी शेळीने चार पिलांना जन्म दिल्याच्या दुर्मीळ घटनाही घडल्या आहेत. मात्र, तब्बल पाच पिलांना जन्म देण्याची सांगोला तालुक्यातील ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.
अजनाळे येथील बिरा टकले हे गेल्या ३० वर्षांपासून शेळीपालन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. बिरा टकले यांच्या उस्मानाबादी जातीच्या शेळीने तब्बल पाच पिलांना जन्म दिला आहे. ही वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने बिरा टकले यांच्या घरी पिले व शेळीला बघण्यासाठी गर्दी केली आहे. अनेक ग्रामस्थ कुतुहलाने ही पिल्ले पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. अनेकांनी शेळीला जुळे, तिळे कधीतरी चार पिल्ल झाल्याचे पाहिल्याचे सांगितले. मात्र, शेळीला एकाच वेळी पाच पिल्ल होणे ही सांगोला तालुक्यात अभूतपूर्व घटना असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगली आहे.