अरुणोदय गणेश मंडळाच्यावतीने आयोजीत चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला शहरातील कुंभार गल्ली येथील अरुणोदय गणेश मंडळाच्यावतीने काल रविवार दि.24 सप्टेंबर रोजी चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेस सांगोला शहरासह तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धा बाल गट, लहान गट, मोठा गट अशा तीन गटात घेण्यात आल्या. स्पर्धा पारदर्शक होण्यासाठी कुंभार गल्लीतील विद्यार्थ्यांनासाठी विशेष असा एक गट तयार करण्यात आला होता. स्पर्धेत 810 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री चेतन कोवाळे सर, उपाध्यक्ष श्री शिवतेज तेली, सचिव श्री गौरव म्हेत्रे, खजिनदार शेखर चाळशी तसेच श्री चैतन्य कांबळे सर, अनिकेत तेली, ओंकार म्हेत्रे, ओंकार लिपारे, अमर लिपारे, ओम भोसले, यश हजारे, अथर्व कवडे, दीपक भागवत, प्रज्वल हत्तरगेकर, सौरभ खारवे, मनोहर बाबर,पवन कांबळे, रोहित फासे, रामचंद्र म्हेत्रे,जयंत खारवे,राहुल पतंगे,काकासाहेब भागवत,निरंजन भागवत, स्वरूप कवडे, शर्विल अंकलगी, अक्षय बेंगलोरकर यांनी परिश्रम घेतले.
चित्रकला स्पर्धा भरविल्याबद्दल मंडळाचे पालक वर्गांमधून विशेष कौतुक करण्यात येत होते. याच पध्दतीने विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा याही पुढे मंडळाने राबव्यात असे पालक वर्गामधून बोलले जात होते.
स्पर्धेमधील उपस्थित असणार्या सर्व विद्यार्थ्यांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये संजीवनी संजय देवळे (कमलापूर) या विद्यार्थ्यांनीस चिठ्ठीव्दारे सायकल मिळाली. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवार दि.27 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळच्या सुमारास कुंभार गल्ली येथे होणार असल्याचे अध्यक्ष चेतन कोवाळे यांनी सांगितले.