महाराष्ट्र
रोटरी तर्फे सात व्यक्तीना व्यवसाय सेवा पुरस्कार प्रदान..
सांगोला रोटरी क्लबने या वर्षी विविध क्षेत्रात उत्कृष्ट व्यवसाय सेवा पुरस्कार प्रदान करुन सप्तरंगी रत्नहार गुंफला आहे,असे कौतुकोद्गार कार्यक्रम अध्यक्ष रो.डॉ.प्रशांत कोल्हे यानी काढले..
सांगोला अर्बन बँकेतील म.फुले सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते..या वेळी व्यासपीठावर रोटरी क्लब सांगोलाचे चार्टर सदस्य डॉ.प्रभाकर माळी,सांगोला रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष इंजि.विकास देशपांडे,सचिव इंजि.विलास बिले,व्यवसाय सेवा समितीचे डायरेक्टर इंजि.संतोष गुळमिरे उपस्थित होते….कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि.विकास देशपांडे यांनी केले त्यांनी रोटरी तर्फे दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला व सर्वांचे स्वागत केले…
रो.डॉ.कोल्हे पुढे म्हणाले की रोटरी सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्थेचा पुरस्कार प्राप्त होणे हा बहुमान असुन या पुरस्काराने चांगले काम करण्यास प्रेरणा मिळेल. या कार्यक्रमात कोल्हे यांच्या हस्ते मेडिकल क्षेत्रातील योगदानाब्द्द्ल कुंडलिक मेखले, आरोग्य विभाग- सुधामती गंगणे, डाक विभाग- सौदागर होवाळ,पशूवैद्यक विभाग -डॉ.मनोज कानडे,विद्युत व्यवसाय सेवा -चंद्रशेखर दूधनी, रविंद्र बोत्रे- वृत्तपत्र वितरण व जनरल स्टोअर्स, प्रसाद पाठक- बैंकिंग या सात व्यक्तीना पुष्पहार,शाल,सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देवून सप्त्नीक सन्मानित करण्यात आले.
त्याचप्रमाणे उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल मोहन मस्के, बेस्ट रोटरी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर म्हणून इंजि हमिद शेख, डिवोटेड रोटरी डायरेक्टर म्हणून डॉ.प्रभाकर माळी, पॉल हॅरिस बद्दल रो.प्रतिमा माळी, रो.रत्नप्रभा माळी तसेच महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे नूतन अध्यक्ष गुलाबराव पाटील याना सन्मानित करण्यात आले,शेवटी आभार प्रदर्शन इंजि.विलास बिले व सूत्रसंचालन इंजि.संतोष भोसले व प्रविण मोहिते यानी केले..या कार्यक्रमास सांगोला अर्बन बँकेचे श्री. शिवगुंडे सो व इतरांचे बहुमोल सहकार्य लाभले…