महाराष्ट्र
प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे 10 फेब्रुवारीला आयोजन
महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड, सोलापूर येथे दि. 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता आय.टी.आय. उत्तीर्ण, 12 वी उत्तीर्ण, डिप्लोमा व पदवीधर उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती (PMNAM) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्यामामध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती (PMNAM) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्व आस्थापना व पात्र प्रशिक्षणार्थी यांनी मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, द्वारा महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस.आर.भालचिम यांनी केले आहे.