क्रांती पाईप्स इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीचा बेस्ट बिझनेस परफॉर्मेंस सन २०२३-२४ चा पुरस्कार वितरण सोहळा हॉटेल जयनिला येथे मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी कंपनीचे डायरेक्टर श्री. सदाशिव बनकर साहेब व श्री. सुभाष गोडसे साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरच्या हस्ते करून करण्यात आली.
प्रास्ताविक योगेश माळी यांनी केले. याप्रसंगी कंपनीचे डायरेक्टर श्री सुभाष गोडसे साहेब बोलताना म्हणले की कंपनी मधील कामगाराच्या पाठीवर कोतूकाची थाप टाकण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पुढे बोलताना म्हणाले की, कंपनी म्हणजेच एक कुटुंब समजून आपण सगळेजन काम करू. कुटुंब प्रमुख म्हणून आम्हीही तुमच्या पाठीशी ठामपणे नेहमी उभे राहू.
अध्यक्षीय भाषणात कंपनीचे डायरेक्टर श्री सदाशिव बनकर साहेब म्हणाले की २०१५-१६ साली लावलेले रोपट्याचे रूपांतर आज मोठ्या वटवृक्ष मध्ये झाले आहे. या पाठी मागे कंपनीमधील सर्व कर्मचारी यांचा मोलाचा वाठा आहे. मध्यंतरीच्या काळात जीएसटी, नोटाबंदी, कोविड – १९, लाईट, कामगार या सर्व आव्हाणांना तोंड देत आपण आज येथे पोचलो आहे. भविष्यात ही अश्याप्रकारे येणाऱ्या संकटाना तोंड देत फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेऊ.
सर्वश्री. दत्तात्रय आदलिंगे, सोमनाथ वेळापूरे, स्वप्नील बनकर, सचिन गोडसे, सुनिल बनकर, रोहित जाधव, अजय ऐवळे, अजित बनकर, हेमंत कुमार प्रसाद, योगेश माळी, संजय बनकर, धनाजी कुंभार, मतेन्दर कुसूवाहा, कांतीलाल कुंभार, आशुतोष गोडसे, राहुल वाघमारे, शहाजी कोळी, अरविंद बनकर, अंकुश पांढरे व अनिता जाधव या सर्वांचा अवॉर्ड व पुष्प देऊन अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सुनिल गोडसे, महादेव मोहिते व कोमल जाधव यांचाही सत्कार अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कंपनीमधील कर्मचारी अनिता जाधव, सुनिल गोडसे यांनी आपले कंपनी बद्दल मनोगत व्यक्त करत कंपनीच्या भरभराठी साठी शुभेछ्या दिल्या.
सूत्रसंचालन सौ. माधुरी जाधव मॅडम यांनी केले तर आभार श्री रोहित जाधव यांनी व्यक्त केले.