ओबीसी महामंडळाच्या थकित कर्ज प्रकरणात संपूर्ण थकित कर्ज रक्कमेचा एक रकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकित व्याज रक्कमेत (५०% सुट) सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा (OTS) योजना दि.३१ मार्च २०२५ पर्यंत राबविण्यात येत आहे त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी योजनेचा फायदा घेऊन कर्ज मुक्त व्हावे,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीमती व्ही.डी. लहारे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनेतंर्गत जिल्ह्यातील इतर मागास प्रर्वगातील लाभर्थ्यांना स्वयंरोजगारकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत केले आहे. जिल्ह्यातील वाटप झालेल्या थकीत लाभार्थ्यांना महामंडळाकडून थकीत व्याज दरात (५०% सुट) सवलत दि.३१ मार्च २०२५ पर्यंत देण्यात येणार आहे. या एक रक्कमी परतावा योजनेचा लाभ घेऊन सर्व संबंधित लाभार्थ्यांनी कर्जमुक्त व्हावे. अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ३ रा मजला, सात रस्ता, सोलापूर जिल्हा कार्यालयाशी (दूरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२५९५) संबधितांनी संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हा व्यवस्थापक श्रीमती व्ही.डी. लहारे यांनी केलेले आहे.