सांगोला(प्रतिनिधी):-पिकअपची व टेम्पोची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी होऊन सांगोला तालुक्यातील गौडवाडी येथील 2 जणांचा मृत्यू झाला असल्याची घटना बुधवार दि.5 फेब्रुवारी रात्री 9.45 वाजणेचे सुमारास सांगोला शहरातील मिरज रोडवर घडली.फिर्याद ग्रामीण रूग्णालय सांगोलाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.असिफ सय्यद यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.
भिषण अपघातामध्ये एकनाथ गडदे (वय 53 वर्षे) व बाबुराव गोडसे (वय 42 वर्षे) दोघे रा. गौडवाडी ता. सांगोला जि. सोलापुर यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे.अकस्मित मयत म्हणून सांगोला पोलीस स्टेशन नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सांगोला पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ गडदे व बाबुराव गोडसे हे टेम्पो मधुन सांगोला येथुन गौडवाडी गावाकडे जात असताना मिरज रोड येथील गायत्री मार्ट समोर सांगोल्याच्या दिशेने येणाया पिकअपची व टेम्पोची धडक बसल्याने त्यामध्ये एकनाथ गडदे व बाबुराव गोडसे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे दाखल केले असता, ते उपचारा पुर्वीच मयत झाले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.पुढील तपास पोहेकॉ/कोकरे हे करीत आहेत.