महाराष्ट्र
चव्हाणवाडी येथील प्राथमिक शाळेत किशोरी मेळावा उत्साहात

महूद, ता. ३ : महूद अंतर्गत असलेल्या चव्हाणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने किशोरी मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन धुळा सातपुते,उमेश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी परी डुबुले,अन्विता निकम,वेदिका जाधव,रोजिया शेख,तनिष्का केसकर,आकांक्षा केसकर यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच या विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली.तर महात्मा ज्योतिराव फुले यांची वेशभूषा सिद्धार्थ गोसावी व शिवतेज वाघमोडे यांनी साकारली. यावेळी विद्यार्थिनींच्या दोरी उड्या,रांगोळी,फुला-पानांचे सुशोभीकरण करणे अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.लेझीम नृत्यही व मनोरंजक खेळ घेण्यात आले.
या कार्यक्रमात विठ्ठल तांबवे व वंदना पाटणे यांनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक उमेश महाजन यांनी केले.तर धुळा सातपुते यांनी आभार मानले.