चोरीला आळा घालण्यासाठी विशेष शोध पथक तयार करणार – पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे; लहान पोलीस चौकी, सीसीटीव्ही, गस्ती वाढविणार असल्याचे नरुटे – जानकर वस्तीच्या शिष्टमंडळास ग्वाही

सांगोला. (प्रतिनिधी) – चोरीला आळा घालण्यासाठी विशेष शोध पथक तयार करणार असल्याचे सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी माकप विधानभवन कार्यालय प्रमुख शाहरुख मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली सांगोला येथील नरुटे – जानकर वस्तीच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले असता सांगितले आहे.
यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांना सांगोला नरुटे – जानकर वस्तीच्या शिष्टमंडळाने दि. 09 मार्च 2022 व दि. 27 जुलै 2022 चोरांचा प्रयत्न हुकला होता. त्यानंतर दि. 22/12/2022 रोजी सांगोला पोलीस ठाणे येथे एफआयआर द्वारे उद्धव पाटील यांनी केलेली नोंद. त्यानंतर दि. 28/12/2022 रोजीची एफआयआर द्वारे दिलीप शिवडे यांनी केलेली नोंद. त्यानंतर दि. 18/09/2023 रोजीची सांगोला पोलीस ठाणे येथे एफआयआर द्वारे सतीश मदने केलेली नोंद असून मदने यांच्या घरी दि. 18 सप्टेंबर 2023 रोजी रात्री ठीक 02 वाजून 30 मिनिटांनी चोरांनी घर फोडून चोरी करून गेले आहे. त्यात 06 तोळे सोने व 02 लाख रुपये घेऊन गेले आहेत. असे मदने यांचे म्हणणे आहे अशी संपूर्ण माहिती गेल्या वर्षभरात झालेल्या चोऱ्यांबाबत माहिती देऊन सविस्तर चर्चा केली. त्यानंतर चलभाष वरून मंगळवेढा उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड व सांगोला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना सीसीटीव्ही लावणे, लहान पोलीस चौकी करणे, गस्ती वाढविण्याच्या आदेश पोलीस अधीक्षक सरदेशपांडे दिल्या.
याप्रसंगी सोलापूर ग्रामीण पोलीस मा. शिरीष सरदेशपांडे साो., मंगळवेढा उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, व सांगोला वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना नरुटे – जानकर वस्ती वर होत असलेल्या चोरी बाबत निवेदन माकप विधानभवन कार्यालय प्रमुख शाहरुख मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी सतीश मदने, भारतीय लष्कर माजी सुबेदार रेवनसिद्ध पाटील, हवालदार उद्धव पाटील उपस्थित होते.