जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सावे माध्यमिक विद्यालयाचे दैदिप्यमान यश.

क्रीडा व युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत कुर्डूवाडी येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सावे माध्यमिक विद्यालयातील खालील खेळाडूंनी यश संपादन केले आहे.
14 वर्षे वयोगटांमध्ये मुलींमध्ये फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत 62 किलो वजनी गटात माने नम्रता नागेश हिने जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला तसेच 42 किलो वजनी गटांमध्ये शेजाळ गौरी अर्जुन हिने जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक पटकाविला आहे .त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने विशेष प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांच्या हस्ते श्रीफळ व गुलाब फूल देऊन करण्यात आला . तसेच या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री बर्गे सर यांचाही सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांनी श्रीफळ व गुलाब फूल देऊन करण्यात आला.
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये दैदीप्यमान यश मिळवलेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री वसंत शेंडगे सर, सचिव श्री मुरलीधर इमडे सर , खजिनदार श्री दिलीप सरगर सर ,संचालक श्री दिलीप शेंडगे सर , श्री गंगाराम इमडे गुरुजी, श्री विठ्ठल सरगर सर व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर व क्रीडा शिक्षक श्री बर्गे सर ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सावे ग्रामस्थ यांनी केले.