प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

सांगोला (प्रतिनिधी) :-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रांतिक सदस्य,महाराष्ट्र वीरशैव सभाचे प्रांतिक अध्यक्ष, सांगोला नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष,आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब ३२३४ड-१ माजी प्रांतपाल, सां.ता.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष व विद्यामंदिर शैक्षणिक संकुल, लायन्स क्लब ,महाराष्ट्र साहित्य परिषद, नगर वाचन मंदिर सांगोला या शाखांचे मार्गदर्शक एक प्रगल्भ व्यक्तिमत्व प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांना शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक ,राजकीय व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे शुभहस्ते,कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार व प्रमुख उपस्थिती बारामती ॲग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार, सदस्य सी.एस.आय.आर डॉ.चंदा निंबकर , उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांचे उपस्थितीत संपन्न झालेल्या समारंभामध्ये स्व.आमदार गणपतराव देशमुख जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात.
प्रा.प्रबुद्धचंद्र झपके कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांचे विचार प्रमाण मानून विद्यामंदिरच्या रूपाने शैक्षणिक क्रांती करत आहात.क्लालिटी आणि क्वाॅन्टिटी ठेवत विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांचा गुणात्मक व रचनात्मक विकास व्हावा यासाठी पोटतिडकीने प्रयत्न करत आहेत तसेच
समाजाचा वैचारिक विकास व्हावा या हेतूने महाराष्ट्र साहित्य परिषद, नगर वाचन मंदिर सांगोला शाखेच्या माध्यमातून साहित्य सेवा व लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक अभ्युदयाचे कार्य व राजकीय क्षेत्रातही तेवढ्याच निष्ठेने व एकनिष्ठपणे कार्य करत आहेत हा विचार प्रमाण मानून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला, विद्यामंदिर परिवार, लायन्स क्लब सांगोला, नगर वाचन मंदिर सांगोला ,महाराष्ट्र साहित्य परिषद सांगोला संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सरांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पुरस्कार वितरण समारंभाच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांना उजाळा मिळाला. राजकारणात राहून सुद्धा दिलेला शब्द तंतोतंत पाळणारे, राजकारणातील राजहंस गणपतराव देशमुख यांच्या नावाने दिल्या जाणारा जीवनगौरव पुरस्कार मला मिळाला याचा मनस्वी आनंद होत आहे.या पुढील काळातही शैक्षणिक, साहित्यिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्याचे सातत्य ठेवण्याचा माझा मानस आहे.
*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके*