फॅबटेक पॉलिटेक्निक च्या अधिकराव गडदे ची फिलिप्स कंपनी मध्ये निवड

सांगोला: येथील फॅबटेक पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन विभागातील अधिकराव गडदे या विद्यार्थ्यांची फिलिप्स हेल्थकेअर इनोव्हेशन सेंटर पुणे या कंपनीत निवड झाल्याचे ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. धनंजय शिवपुजे यांनी सांगितले.

फिलिप्स हि आंतरराष्ट्रीय कंपनी असून हेल्थ केअर विभागाच्या भारताबाहेर सिंगापूर, इंडोनेशिया, कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या ठिकाणी शाखा आहेत. सांगोला सारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना फॅबटेक कॉलेज ने आंतराष्ट्रीय कंपनी मध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सदर कंपनी मध्ये निवड झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर,  कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा. तानाजी बुरुंगले, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्रा. महेश वाळूजकर, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. राहुल काळे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button