तालूका स्तरीय कुस्ती स्पर्धेत फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्यूनिअर काॅलेजचे घवघवित यश

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सांगोला मधील विद्यार्थ्यांनी कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असल्याची माहिती प्राचार्य सिकंदर पाटील यांनी दिली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे अंतर्गत तालुका क्रीडा कार्यालय सांगोला तसेच गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सांगोला यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी तालूका स्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत १७ वर्ष वयोगटातील कुस्ती मध्ये श्री कोळेकर ग्रिको रोमन कुस्ती प्रथम क्रमांक व आदर्श शिंदे व्दितीय क्रमांक यांनी प्राप्त केला आहे. तसेच १९ वर्षे वयोगट ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत अजिंक्य शिंदे प्रथम क्रमांक, अभिषेक शिर्के, राहूल जमदाडे, शुभम साळूंखे यांनी व्दितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच मुलींच्या गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात धनश्री शेंबडे व्दितीय क्रमांक व प्रार्थना नरुटे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक पंचाक्षरी स्वामी व आरिफ तांबोळी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व मान्यवरांच्या हस्ते सक्तार करण्यात आला. यादरम्यान विद्यार्थ्यांचे स्कूलच्या सीईओ सारीका रूपनर, प्राचार्य सिकंदर पाटील आदींसह स्कूल मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.



