रोटरी क्लब सांगोला व अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगोला यांच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याविषयी जनजागृती व्याख्यान …

रविवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी महात्मा फुले सभागृह येथे रोटरी क्लब सांगोला व अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने राज्य कार्यकारिणी मार्फत अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लोकांना समजावा यासाठी जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती. त्या यात्रेचा आपल्या सांगोल्यातील संवाद जनतेशी घडवून आणण्यासाठी दोन्ही संघटनांनी पुढाकार घेऊन जनसंवाद घडवून आणला.
या जनसंवाद यात्रेमध्ये नंदिनी जाधव व रणदिवे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. रोटरीचे दहा ते पंधरा सदस्य उपस्थित होते. कायद्याचे वेगवेगळे बारा अनुसूची आहेत त्या अनुसूचींचा चित्र द्वारा माहिती देऊन शंका निरसन केले .
कोणकोणत्या परिस्थितीत भोंदू बुवा आणि बाबांवर कार्यवाही होऊ शकते हे जनतेला समजावून सांगितले आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन भोंदूबाबा लोकांना भ्रमित करतात. याबद्दल रणदिवे यांनी मार्गदर्शन केले. पाण्याचा दिवा पेटवून दाखविला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय दिला. शेवटी डॉक्टर प्रभाकर माळी यांनी समारोपामध्ये छोट्या छोट्या अंधश्रद्धा समजावून सांगितल्या अशाप्रकारे हा कार्यक्रम शंका निरसन करून व वेगळी माहिती देऊन संपन्न झाला.



