मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमास महिला तालुकाध्यक्ष सखुताई वाघमारे यांच्या वतीने धान्य वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष, मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत शहरातील मातोश्री वृद्धाश्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुकाध्यक्ष सखुताई वाघमारे यांच्या वतीने धान्य वाटप करून आबांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीच्या विधानसभा महिला अध्यक्षा सुचिता काकी मस्के यांच्याकडून वृद्धाश्रमातील नागरिकांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. तर इतर सदस्यांकडून अल्पोपार फळे वाटप करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुकाध्यक्ष सखुताई वाघमारे, तालुका विधानसभा अध्यक्षा सुचिता काकी मस्के यांच्या पुढाकाराने तर ॲड. शशिकला खाडे, ॲड. चैत्रजा बनकर, ॲड. पद्मजादेवी भुसे, सरस्वतीताई रणदिवे, मंगल खाडे, हसीना मुलांनी, जयश्री पाटोळे, पद्मिनी वायदंडे, ना. मा. कांबळे, रेश्मा पांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृद्धाश्रमास भरीव मदत करण्यात आली.
मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा वाढदिवस तालुक्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका अध्यक्षा सखुताई वाघमारे यांच्याकडून एक क्विंटल तांदूळ, 50 की. गहू, 50 की. ज्वारी, तेलाचा डबा देण्यात आला. सुचिता काकी मस्के यांच्याकडून वृद्धाश्रमातील नागरिकांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. ॲड. चैत्रजा बनकर यांनी साखर तर ॲड. खाडे यांनी फळे वाटप करण्यात आली.
ॲड. महादेव कांबळे यांनी महिलांनी केलेल्या कार्याचे कौतुक करीत, शाल, फेटे, पुष्पहार देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यापेक्षा वंचित घटकांना मदत करून दिलेल्या शुभेच्छा निश्चितपणे प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. तर सखुताई वाघमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या देखील पलीकडे जाऊन सर्वसामान्यांना मदतीचा हात देण्याची भूमिका बजावली आहे. निश्चितपणे त्याच विचाराचा वारसा जोपासत समाजातील गरजू घटकांना मदत करण्याची भूमिका घेऊन मातोश्री वृद्धाश्रमास आम्ही सर्व महिलांनी एकत्रित येऊन मदत केली आहे. यातूनच आबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वृद्धाश्रम यांच्याकडून सर्वांचे आभार मानले.