महाराष्ट्र

अजनाळे येथील गौतम धांडोरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

अजनाळे : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक माजी सेवानिवृत्त शाखाधिकारी गौतम बाबुराव धांडोरे यांचे शनिवार दि  २८ डिसेंबर २०२४ रोजी  रात्री ९ च्या सुमारास अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. निधना समयी त्यांचे वय ६६ वर्ष इतके होते. त्यांच्यावर रविवार दिनांक २९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते  माजी जि.प सदस्य संगम (आप्पा) धांडोरे यांचे ते बंधु होते

गौतम धांडोरे  यांच्या पाश्चात पत्नी,२ मुली,२ मुले ,३ भाऊ ,नातवंडे  असा मोठा परिवार आहे त्यांचा स्वभाव शांत व मनमिळावू असा  होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी मंगळवार दि ३१ डिसेंबर २०२४ रोजी  सकाळी ८ वाजता अजनाळे येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. फोटो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button