सांगोला तालुका

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका, नाझरे येथे नूतन अधिकार्‍यांचा सत्कार

नाझरे(वार्ताहर):-ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका नाझरे येथे गुरुवारी एमपीएससीद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेतील यशस्वी अधिकार्‍यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. नाझरे गावचे सुपुत्र संजीवकुमार नानासो सकट (राज्य कर निरीक्षक/सहायक कक्ष अधिकारी), लेंडवे चिंचाळे येथील प्रदीप पाटील (राज्य कर निरीक्षक), सांगोल्याचे स्वप्निल गायकवाड (क्लार्क, पुणे महानगर पालिका )यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी उपसरपंच शशी पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ.सुवर्णा पाटील, सौ.सुमित्रा लोहार, निवृत्त शिक्षक भारत वाघमारे गुरुजी, रवी शेटे सर, संभाजी हरिहर, आपुराज आदाटे व गावातील युवक-युवती, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभ्यासिकेसाठी समाज मंदिर उपलब्ध करून दिल्याबद्दल नाभिक समाजाचे विशेष आभार मानण्यात आले. त्याबद्दल श्री. व सौ.दीपक खंडागळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संभाजी हरिहर सर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यातून त्यांनी उपसथितांसमोर शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. सत्कारमूर्तीनी आपल्या मनोगतातून युवक – युवतींना आपल्या यशाबद्दल माहिती सांगुण मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन विद्यार्थी प्रदीप पाटील याने तर आभार प्रदर्शन तातोबा जावीर व मारुती बंडगर यांनी मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!