महाराष्ट्र
फॅबटेक इंजिनिअरींग मध्ये ई.एन.टी.सी विभागांतर्गत गेस्ट लेक्चर संपन्न

सांगोला : फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च, मधील ई.एन.टी.सी विभागांतर्गत फीडबॅक ॲम्प्लीफायर डिझाईन या विषयावर गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात आले होते, अशी माहिती ई.एन.टी.सी.विभाग प्रमुख प्रा. धनश्री राऊत यांनी दिली. ई.एन.टी.सी.विभागांतर्गत फीडबॅक ॲम्प्लीफायर डिझाईन या विषयावर गेस्ट लेक्चर देण्यासठी सोलापूर येथील प्रा. आय.आय.मुजावर हे उपस्थित होते.
यावेळी प्रा.आय.आय.मुजावर यांनी विद्यार्थ्यांना फीडबॅक ॲम्प्लीफायर डिझाईन व त्यांचे प्रकार याबाबत सविस्तर माहिती उदाहरणासह दिली. तसेच इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात असणाऱ्या करियरच्या विविध संधी बाबतची माहिती विद्यार्थ्यांना दिली. इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीच्या क्षेत्रात सातत्याने अमुलाग्र बदल होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील हार्डवेअरची अद्यावत माहिती आत्मसात करावी या संदर्भात मार्गदर्शन केले.
हे गेस्ट लेक्चर संस्थेचे चे चेअरमन मा. श्री.भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी प्राजक्ता रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे, डीन अँकँडमीक डॉ. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व ई.एन.टी.सी.विभाग प्रमुख प्रा. धनश्री राऊत, प्रा.दुर्गा पाटील ,प्रा.ऋषिकेश देशमुख,कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.राहुल पाटोळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले . कु.प्रांजली नागणे या विद्यार्थिनीने उपस्थितांचे आभार मानले.