सांगोला तालुका

मंथन परीक्षेचा रविवारी कमलापूर येथे बक्षीस वितरण समारंभ; केंद्र, जिल्हा व राज्य गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा होणार सन्मान:-

मंथन वेल्फेअर अहमदनगर संचलित मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा २०२२-२३चा बक्षीस वितरण समारंभ रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. सिंहगड कॅम्पस कमलापूर येथे संपन्न होणार असल्याची माहिती स्पर्धा परीक्षा तालुका समन्वयक समाधान केदार यांनी दिली आहे.

हा बक्षीस वितरण समारंभ सांगोला पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. रविंद्र राजुलवार यांच्या शुभहस्ते, व सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. हेमंतकुमार काटकर यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

तसेच सिंहगड कॅम्पस कमलापूरचे संचालक मा. अशोक नवले, रोटरी क्लबचे अध्यक्ष मा. साजीकराव पाटील, पाठ्यपुस्तक मंडळाचे सदस्य मा. सुनील बनसोडे, आनंद विद्यालय कमलापूरचे मुख्याध्यापक मा. निर्मलकुमार आदलिंगे, इंग्रजी अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष मा. फिरोज आतार, गणित अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष मा. शिवाजी चौगुले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तर पंचायत समिती सांगोला येथील शिक्षण विस्तार अधिकारी मा.दिगंबर गायकवाड, मा.लक्ष्मीकांत कुमठेकर, मा. अरुणा वाघमारे, मा. सुयोग नवले, सानेगुरुजी कथामालेचे मार्गदर्शक सिध्देश्वर झाडबुके, शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष भारत लवटे, शिक्षक संघ थोरात गट तालुकाध्यक्ष सुहास कुलकर्णी, आदर्श शिक्षक समितीचे अध्यक्ष अल्लाउद्दीन तांबोळी, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष उध्दव नागणे, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष विवेक ऐवळे, जुनी पेन्शन हक्क संघटना तालुकाध्यक्ष महेश कसबे, शिक्षक भारती संघटना तालुकाध्यक्ष विलास गडदे यांची उपस्थिती लाभणार आहे.

तसेच यावेळी प्रसिद्ध व्याख्याते मा‌. दादासाहेब खरात यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले आहे.

या बक्षीस वितरण समारंभात सांगोला तालुक्यातील केंद्र व जिल्हा गुणवत्ता यादीतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. अशी माहिती स्पर्धा परीक्षा तालुका सहसमन्वयक सौ. प्रियांका केदार यांनी दिली आहे.

या बक्षीस वितरण समारंभासाठी गुणवत्ता यादीतील विद्यार्थी पालक व मार्गदर्शक शिक्षक बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्पर्धा परीक्षा तालुका समन्वयक समाधान केदार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!