इनरव्हील क्लब यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय खेळाडू साठी अर्थीक मदत

सांगोला (प्रतिनिधी):- इनरव्हील क्लब ऑफ सांगोला त्यांच्याकडून सावित्रीबाई फुले प्रशाला सोनंद या स्कूलची आठवीची विद्यार्थिनी कु.सिद्धेश्वरी लालासो काशीद हिची सिकई मार्शल आर्ट मधून गव्हर्मेंट राष्ट्रीय स्तरावर निवड व कराटेमध्ये इंटरनॅशनल स्तरावर निवड झाली आहे.
तिला पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नेपाळमध्ये होणाऱ्या कराटे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला 30 हजार खर्च तिचे आई-वडील शेतकरी आहेत तिची परिस्थिती खूप हलाखीची आहे सदर खर्च करण्याची तिच्या शेतकरी आई-वडिलांची परिस्थिती नाही अशा वेळेला इनरव्हील क्लब ने तिला मदतीचा हात व थोडासा सिंहाचा वाटा म्हणून व अथर्व शिष्य गणेश मंडळ महिलांनी 2 हजार रुपये असे 10 हजार रुपये रोख रक्कम देऊन तिचे पुढील स्पर्धेसाठी अभिनंदन केले इनरव्हील क्लब नेहमी गरजू व्यक्तींना मदतीचा हात देते.
सदर कार्यक्रमासाठी क्लबच्या माझी अध्यक्ष अरुणा घोंगडे व मंगल लाटणे एडिटर संगीता चौगुले अंकिता आनेकर वैशाली आंधळगावकर सोनंद शाळेतील मॅडम संगीता शेडसाळे छोटी शिवन्या सिद्धेश्वरी काशीद उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील संगीता मॅडमनी सर्वांचे आभार मानले.