शिवश्री विनायक(राजू) शिंदे यांची संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष पदी निवड

सांगोल्याचे शिवश्री राजूभाऊ शिंदे यांची संभाजी ब्रिगेड सांगोला तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच हर्षल बागल यांची संभाजी ब्रिगेड राज्य प्रवक्ते पदी निवड करण्यात आली.
संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांचा शासकीय विश्रामगृह,सात रस्ता सोलापूर येथे १ डिसेंबर रोजी संभाजी ब्रिगेड रौप्यमहोत्सवी अधिवेशन निमित्त नियोजन व सोलापूर जिल्हा संपर्क दौरा होता. त्यावेळी प्रविण दादा संर्वांना संबोधित करताना म्हणाले की, बहुजन समाजातील शेकडो तरुण निरर्थक वादामध्ये गुंतले आहेत. या तरुणांना वादाकडून आर्थिक विकासाकडे वळवण्यासाठी संभाजी ब्रिगेड ही संघटना जगभर काम करणार आहे. यासाठी 28 डिसेंबर रोजी पुण्यात राज्यस्तरीय रौप्य महोत्सवी अधिवेशन आयोजित केल्याची माहिती प्रवीण दादा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.यादरम्यान गायकवाड म्हणाले की बहुजन समाजाचे मूलभूत प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. या समाजातील अनेकांनी देशाला घडवण्यासाठी बलिदान दिले आहे, संघर्ष केला आहे पण समाजातील तरुण निरर्थकवादामध्ये अडकले आहेत. कोणाबद्दल तरी विद्वेष करणे,टीका करणे, कमेंट्स करणे यासाठी संभाजी ब्रिगेड कार्यरत नाही.आम्ही मूलभूत प्रश्न सोडवून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी काम करीत आहोत. या पार्श्वभूमीवर 28 डिसेंबर रोजी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच मध्ये ब्रिगेडचे रौप्य महोत्सवी अधिवेशन होणार आहे या अधिवेशनात मराठा समाजासह इतर समाजातील मान्यवरांना मार्गदर्शनासाठी बोलवण्यात आले आहे.
त्यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रदिप कणसे, पुणे विभागीय अध्यक्ष दिपकदादा वाडदेकर, पुणे विभागीय उपाध्यक्ष राजू मगर, जिल्हाध्यक्ष सोलापूर विभाग संभाजी भोसले, जिल्हाध्यक्ष पंढरपूर विभाग प्रदिप मिसाळ-पाटील, सोलापूर महानगराध्यक्ष श्यामभैया कदम, मल्हार गायकवाड, कौस्तुभ शिंदे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेड रौप्य महोत्सवी अधिवेशनात ज्येष्ठ विचारवंत आ.ह.साळुंखे (सातारा),ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार (कोल्हापूर), मा.म.देशमुख(नागपूर) यांचा कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले