राजकीय

सांगोला तालुका 6 ग्रामपंचायत निवडणुक: उमेदवारी अर्ज छाननी मध्ये एकही अर्ज बाद नाही.

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला तालुक्यातील 6 ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत. याकरिता  सरपंच पदासाठी सदस्य पदासाठी 45 तर  ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 265 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काल सोमवार दि.5 डिसेंबर  रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेत सर्वच्या सर्व अर्ज वैद्य ठरविण्यात आले.
सांगोला तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीतील अर्जांची छाननी प्रक्रिया काल सोमवार दि.5 डिसेंबर रोजी पार पडली. यावेळी सहा ग्रामंपचायतीच्या सरपंच पदासाठी प्राप्त झालेले 45 उमेदवारी अर्ज तर 62 सदस्य पदासाठी 265 अर्ज प्राप्त झालेले होते. प्राप्त झालेले सरपंच तसेच सदस्यपदाचे सर्वच्या सर्व अर्ज वैद्य ठरले
ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्‍या सांगोला तालुक्यातील बलवडी, चिणके, अनकढाळ, चिंचोली, पाचेगाव खु  व शिवणे या 6 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.18 डिसेंबर 2022 ला मतदान होणार असून 20 डिसेंबर 2022 ला निकाल जाहीर होणार आहे. उद्या बुधवार दि.7 डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत असणार असून दुपारी 3 नंतर निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!