सांगोला तालुका

न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनि.कॉलेज सांगोलाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीरास कमलापूर येथे प्रारंभ

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला संचलित न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनि.कॉलेज सांगोलाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीरास मंगळवार दि.6 डिसेंबर ते सोमवार दि.12 डिसेंबर या कालावधीत कमलापूर येथे प्रारंभ होत असल्याची माहिती प्राचार्य श्री.लक्ष्मण गावडे यांनी दिली. या शिबीरात रा.से.यो.चे. स्वयंसेवक युवकांचा ध्यास ग्रामविकास या ध्येयाने प्रेरित होऊन कार्य करणार आहेत. या शिबीरामध्ये प्लास्टीकमुक्त अभियान, ग्रामस्वच्छता, जलसंवर्धन, महिला सबलीकरण, व्यक्तीमत्व विकास, पर्यावरण संवर्धन, श्रमसंस्कार आदी महत्वाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
आज मंगळवार दि.6 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता चंद्रकांतदादा देशमुख यांच्या शुभहस्ते या शिबीराचे उद्घाटन संपन्न होणार आहे. अध्यक्षस्थान सरपंच सौ.कलावती बंडगर या भूषविणार आहेत.यावेळी श्री.विठ्ठलराव शिंदे, श्री.रामचंद्र खटकाळे, डॉ.प्रभाकर माळी, श्री.लक्ष्मण राख, सौ.संगिता धांडोरे, सौ.राणीताई कोळवले, श्री.बबनराव जानकर, श्री.पांडुरंग पांढरे, प्रा.डॉ.अशोक शिंदे, प्रा.दिपक खटकाळे, प्रा.जयंत जानकर, श्री.अवधुत कुमठेकर, प्राचार्य श्री.लक्ष्मण गावडे, श्री.देविदास ढोले, श्री.विजय म्हेत्रे, श्री.बाबुराव बंडगर यांच्यासह ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
दैनंदिनीमध्ये पहाटे 5 वाजता प्रात:विधी, सकाळी 5.30 हजेरी व व्यायाम, सकाळी 7 वाजता नाष्टा, सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत श्रमदान, दुपारी 12 ते 4 भोजन व विश्रांती, दुपारी 4 ते 7 बौध्दिक कार्यक्रम, सायंकाळी 8 वाजता भोजन व रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत सांस्कृतीक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत.
बुधवार दि.7 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता डॉ.जवाहर मोरे यांचे हास्य खजिना याविषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले आहे. कायर्र्क्रमाचे अध्यक्षस्थान तंटामुक्तीचे उपाध्यक्ष श्री.सोमनाथ अनुसे हे भूषविणार आहेत.गुरुवार दि.8 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता प्रा.दिपक खटकाळे यांचे संतुलित आहार व आरोग्य या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री.अंकुश गोडसे हे भुषविणार आहेत.
शुक्रवार दि.9 डिसेंबर रोजी दुपारी 1 ते 5 या वेळेत सर्व रोग निदान शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.शनिवार दि.10 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता प्रा.चंद्रकांत इंगळे यांचे जीवन सुंदर आहे या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री.सिताराम अनुसे भूषविणार आहेत. रविवार दि.11 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता श्री.प्रकाश बाबर यांचे जीवनातील संस्काराचे महत्व या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले आहे. अध्यक्षस्थान श्री.बसवेश्वर म्हमाणे हे भूषविणार आहेत.
शिबीरातील सर्व कार्यक्रमास श्रीरंग गोडसे, प्रा. विष्णू गोडसे. श्री. हणमंत तंडे, श्री.बसवेश्वर म्हमाणे, श्री. रघुनाथ ऐवळे, श्री ऋणील चंदनशिवे, श्री. राजाराम चंदनशिवे, श्री. कोळी , श्री. शिव ऐवळे , श्री. अनिल खटके , श्री. बशिर मुलाणी, श्री. अमोगसिद्ध कोळी, श्री. महादेव वाघमारे , श्री. बाबासो अनुसे, श्री. कुमार जाधव, श्री. अनिल पडवळे, श्री. जालिंदर आदलिंगे, . ज्ञानेश्वर शंकर तंडे , श्री. सखाराम आदलिंगे , श्री. आनंदा तंडे, श्री. मंगेश म्हमाणे, श्री. सुरेश केसकर, श्री. मारुती देवकते, श्री. रामचंद्र तंडे, श्री. सुरेश तंडे, श्री. मारुती देवकते, श्री. मंगेश आदलिंगे, श्री. प्रकाश देवळे, श्री. ज्ञानेश्वर तंडे , श्री. आबासो पांढरे (गुरुजी), श्री. किसन तंडे, श्री. नाथा ऐवळे, श्री. धर्मराज टकले, श्री विजय आण्णासो तंडे, श्री नामदेव आदलिंगे, श्री. भगवान पाटील, श्री. तात्यासो पांढरे, श्री. नारायण गोडसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सोमवार दि.12 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत समारोप समारंभ आयोजीत करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री.विठ्ठलराव शिंदे भूषविणार आहेत.यावेळी श्री.रामचंद्र खटकाळे, प्राचार्य लक्ष्मण गावडे, मधुकर तंडे, नितीन काळे, रावसाहेब अनुसे, रुपाली सत्यवान तंडे, सुमन दत्तात्रय पुजारी, लता साधू गोडसे, अंकुश हरिबा गोडसे, रुक्मिणी श्रीपती आदलिंगे, मुक्ताबाई रामचंद्र देवळे, प्रकाश जगन्नाथ ऐवळे, लता बाळू तोरणे, विजय जगन्नाथ अनुसे, हणमंत दामू गोडसे, सोमनाथ महादेव अनुसे, रमेश दत्तात्रय वाघमारे, सौ.मयुरी वाघमारे यांच्यासह सर्व ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहेत.
यावेळी सहा.शिक्षण उपसंचालक मीना शेंडकर, योजनेचे समन्वयक पोपटराव सांबारे, तहसीलदार अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे आदी मान्यवर सदिच्छा भेट देणार आहेत.तरी या शिबीराप्रसंगी आयोजीत करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमास कमलापूर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन उपप्राचार्य हेमंतकुमार आदलिंगे, पर्यवेक्षक नामदेव कोळेकर, प्रकल्प अधिकारी प्रा.संतोष राजगुरु, कार्यक्रमाधिकारी प्रा.मिलिंद पवार, प्रा.अजित देशुमुख, प्रा.संदिप भुसनर यांच्यासह सरपंच सौ.कलावती बंडगर व ग्रामसेविका सौ.सुनिता गवंड यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!