सांगोला तालुकाशैक्षणिक

कै. प्रणव उर्फ आकाश घोंगडे स्मृतीप्रित्यर्थ सांगोला विद्यामंदिरमध्ये गणवेश वाटप; ॲड उदय घोंगडे परिवाराकडून सायकल बॅंकेस पाच सायकल्स

सांगोला (वार्ताहर) कै. प्रणव उर्फ आकाश उदय घोंगडे यांचे स्मृतीप्रित्यर्थ ॲड. उदय (बापू) घोंगडे व घोंगडे परिवार यांचेकडून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना प्रतिवर्षीप्रमाणे गणवेश वाटप करण्यात आले. सांगोला विद्यामंदिरच्या सायकल बँक या नवोपक्रमामध्ये घोंगडे परिवाराकडून पाच सायकल्स यावेळी देण्यात आल्या.

 

याप्रसंगी व्यासपीठावर ह.भ.प. सुभाष लऊळकर सर (सचिव- विद्याविकास मंडळ, जवळे) प्रशुद्धचंद्र झपके साहेब (सहसचिव- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला), ॲड.नितीनजी बकाल सो., बार्शी, उद्योगपती आनंदकाका घोंगडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष कै.चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार समर्पणाने झाली.

 

प्रास्तविकात प्राचार्य जी.एन.घोंगडे यांनी ॲड.उदय घोंगडे व परिवाराच्यावतीने प्रतिवर्षी होणारे गणवेश वाटप व नव्याने सुरू झालेल्या सायकल बँक उपक्रमात मदत मिळाल्याबद्दल ऋण व्यक्त करत सदर सायकल बँकेमध्ये सलग पाच वर्षे प्रतिवर्षी 5 प्रमाणे एकूण 25 सायकल्स देण्याचा घोंगडे परिवाराचा मनोदय असल्याचे सांगितले.

प्रमुख पाहुणे सुभाष लऊळकर यांनी आपल्या मनोगतातून कै. प्रणव याच्या स्मृती जपत परिवारातर्फे करण्यात येणाऱ्या सद्कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी सायकल बँकेच्या माध्यमातून सानिका मोटे, ओम नायकुडे, प्रथमेश पवार, आशा बुरांडे व दिपाली दोलतडे यांना सायकल्सचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे आभार उपमुख्याध्यापक एल.बी.विधाते यांनी तर सूत्रसंचालन वैभव कोठावळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशाला उत्सवा विभाग प्रमुख श्री नरेंद्र होनराव सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!