फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी*

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज मध्ये राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज यांनी आपापल्या संस्थानांमध्ये अनेक क्रांतिकारक पाऊल टाकून स्वतःपासूनच बदलांची सुरुवात केली होती. त्यात इंग्रजी शिक्षण, मुलींचे शिक्षण,विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन,विधवांचे शिक्षण अशा वेगवेगळ्या कार्यात त्यांनी बदल घडवून आणले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील, ए.ओ.वर्षा कोळेकर, सुपरवायझर वनिता बाबर हे लाभले. प्रथम पाहुण्यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. त्यानंतर इयत्ता तिसरीतील इंद्रनील गायकवाड, सातवीतील श्रेया जगताप यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या बद्दल माहिती सांगितली. प्रशालेतील शिक्षक डॉ. अमोल रणदिवे यांनी राजश्री शाहू महाराजांबद्दल माहिती सांगून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू आपल्या गायनातून विद्यार्थ्यांसमोर सादर केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. कोमल पवार यांनी केले. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. संजय देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. फॅबटेक संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, शाळेचे प्राचार्य श्री.सिकंदर पाटील, ए.ओ. कोळेकर सुपरवायझर वनिता बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.