महाराष्ट्र

युवा उद्योगपती प्रमोददादा साळुंखे पाटील यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रमांनी  साजरा 

वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रम येथे अन्न धान्य व फळे तर ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णांना फळे वाटप  

वाढदिवसाला होणारा खर्च टाळून चिंचोली रोडवरील मातोश्री वृद्धाश्रम येथील वयोवृद्धांना अन्नधान्य व फळे वाटप करून तसेच सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना फळे वाटप करून प्रमोददादा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवारा कडून एक आगळावेगळा अभिनव उपक्रम राबविला. तर प्रमोद दादा साळुंखे पाटील यांना राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, डॉक्टर, वकील, उद्योजक, पत्रकार, व्यापारी, या सह विविध संघटना यांच्याकडून  प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सोशल मीडियावरून युवा उद्योगपती प्रमोददादा साळुंखे पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

 

 

   यावेळी ॲड. मुक्तार इनामदार, युवा उद्योगपती साहिलभाई इनामदार, मनोज गरंडे, बापू देवकते, संभाजी कांबळे, पिरसाहेब फकीर, सुधीर कोले यांच्यासह सांगोला ग्रामीण रुग्णालयातील डॉ. पूजा साळे मॅडम, नागेश दोशेट्टी, अतुल, शिपाई भोरे तसेच सिस्टर व कर्मचारी त्याचबरोबर वृद्धाश्रम चे जाधव व वयोवृद्ध नागरिक आदी उपस्थित होते.

    वाढदिवस म्हटलं की, केक कापने, मित्रांना पार्टी देण्यासाठी खर्च केलाच जातो. परंतु अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्याऐवजी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे हा विचार युवा उद्योगपती प्रमोददादा साळुंखे पाटील मित्र परिवार यांच्या मनात आला आणि वाढदिवस समाजातील उपेक्षित घटकांसोबत साजरा करण्याचे ठरवले. त्यानुसार वयोवृद्ध आणि निराधार नागरिकांच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य याच मित्राला अर्थात प्रमोद दादा साळुंखे पाटील यांना शुभेच्छा म्हणून, साहिलभाई इनामदार व मनोज गरांडे, ॲड. मुक्तारभाई इनामदार त्याच बरोबर पाच पांडव ग्रुप यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. व उपस्थित सदस्यांसह सांगोला ग्रामीण रुग्णालय व मातोश्री वृद्धाश्रम येथे अन्नधान्य व फळे वाटप करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.

    युवा उद्योगपती व लय भारी उद्योग समूहाचे मालक प्रमोददादा साळुंखे पाटील यांनी उद्योग क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये  उत्तुंग भरारी घेतली आहे. त्याच पद्धतीने मित्रपरिवार आणि त्यांच्यासोबतचे हितसंबंध ही मोठ्या प्रमाणात जोपासले आहेत.  यासह गोरगरीब गरजू साठी केलेली मदत निश्चितपणे कौतुकस्पद आहे. यामुळे प्रमोददादा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त  गोरगरीब गरजू रुग्णांना फळे व वृद्धाश्रम येथील वयोवृद्ध नागरिकांना अन्नधान्य वाटप केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार यांनी केलेला अभिनव उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button