इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांचा पदग्रहण समारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न

इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांचा पदग्रहण सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. इनरव्हील क्लब चे सर्व पदाधिकारी तसेच निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या म्हणून डिस्ट्रिक्ट 317 इनरव्हील क्लब ऑफ सांगली च्या एडिटर सविता तंगडी उपस्थित होत्या.
मावळत्या प्रेसिडेंट सो सविता लाटणे यांनी गतवर्षी त्यांना प्रोजेक्टसाठी मदत केलेल्या मेंबर्सना गिफ्ट देऊन सन्मानित केले तसेच प्रमुख पाहुण्यांना फुलाचे झाड व शाल देऊन इनरव्हील क्लब कडून त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी सिक्रेटरी सौ अश्विनी कांबळे यांनी 23 24 या वर्षाचा वार्षिक अहवाल सादर केला तसेच आय एस ओ व एडिटर यांनीही आपले वर्षभराचे काम मेंबर्सना सांगितले.आजी-माजी अध्यक्षांचे मनोगत झाले.
त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ वनिता चव्हाण यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये इनरव्हील क्लब मध्ये कोणकोणते प्रोजेक्ट राबवावे व निसर्ग बचावासाठी प्लास्टिक मुक्ती कशी करावी यावरती मार्गदर्शन केले.इनरव्हील क्लब मध्ये नूतन सदस्या सौ दिपाली कोळसे पाटील व डॉक्टर सौ नेहा पाटील यांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे निवेदन इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्ष माधुरी गुळमिरे यांनी केले तसेच हार्ट बीट ऑफ हुमानिटी हा लोगो असलेली रांगोळी इनरव्हील क्लबच्या नूतन सेक्रेटरी सौ पल्लवी थोरात यांनी अतिशय सुंदररीत्या काढली होती.याकार्यक्रमासाठी रोटरी क्लब चे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच अथर्वशीर्ष महिला मंडळ आणि चौंडेश्वरी महिला मंडळ चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हाईस चेअरमन सुजाता पाटील यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.