सांगोला विद्यामंदिरचा बास्केटबॉल संघ जिल्हास्तरीय विजयी

दिनांक १५/०९/२०२३ रोजी अकलूज या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये १९ वर्षे वयोगट मुली बास्केटबॉल स्पर्धा अंतिम सामन्यात  सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला हा संघ विजयी झाला.
 या संघाने सुरुवातीस माढा तालुक्याच्या संघांचा पराभव करून अंतिम सामन्यात पंढरपूर तालुक्याचा पराभव करत अंतिम सामना जिंकला.
बास्केटबॉल संघ:- तनाज मण्यार, अनघा बोत्रे, सुप्रिया भुईटे, स्नेहा फुले, ऐश्वर्या घोंगडे, सायली वाघमारे, प्राची पाटील, तनिषा गुळवे, तृप्ती भोसले, आसावरी कुलकर्णी, अमृता लोहार, मेघा चव्हाण. हे खेळाडू सहभागी झाले होते.*
वरील सर्व यशस्वी खेळाडूंना , क्रीडा विभाग प्रमुख ज्युनिअर कॉलेज- प्रा. डी.के पाटील,नरेंद्र होनराव , अन्सार इनामदार , सुभाष निंबाळकर , प्रा.संतोष लवटे. यांचे मार्गदर्शन लाभले.
 *वरील सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे सर, खजिनदार  शंकरराव सावंत सर,सहसचिव मा. प्रशूद्धचंद्र झपके , संस्था सदस्य विश्वेश झपके,प्राचार्य गंगाधर घोंगडे सर, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते सर, उपप्राचार्या सौ शाहिदा सय्यद मॅडम, पर्यवेक्षक – बिभीषन माने सर, पोपट केदार सर (क्रीडा नियंत्रक), अजय बारबोले सर. सर्व अध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून  विभागस्तरासाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button