सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

खा.रणजितसिंह निंबाळकरांच्या प्रयत्नांतून आठ नगरपालिकांना ४ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर – चेतनसिंह केदार-सावंत

 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत खा.रणजितसिंह निंबाळकरांच्या प्रयत्नांतून जिल्ह्यातील सांगोला करमाळा, कुर्डुवाडी, माढा, अकलूज, नातेपुते, माळशिरस, म्हाळुंग या नगरपालिकांना ३८ विकासकामांसाठी ४ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत नगरपालिकांना विकासकामांसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. सांगोला नगरपरिषद हद्दीतील पवन खाडे मळा ते मान नदीपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे १० लाख, बेले मळा ते मान नदीपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे १० लाख, कुमार ढोले घर ते राजेंद्र भोरे घरापर्यंत दक्षिण उत्तर चालीचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे १० लाख, कडलास रस्ता हॉटेल सितारा ते डॉ.परेश खंडागळे घरापर्यंत रस्ता सुधारणे १० लाख, प्रभाग क्रमांक सहा येथे मच्छिंद्र बनकर घर ते श्रीकांत बनकर घर रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, चांडोलेवाडी येथे स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे १० लाख करमाळा नगरपालिकेला वार्ड क्र.१ मध्ये जिम साहित्य खरेदी करणे १० लाख, म.गांधी इंग्लिश मिडीयम स्कूल शाळा बांधकाम करणे २० लाख, म.फुले पुतळा ते कर्जत रोड रस्ता करणे १० लाख, कैकाडी समाजमंदिर बांधणे १० लाख, गुजर गल्ली ते समंतभद्र शिशु मंदिर रस्ता काँक्रीटीकरण व गटार बांधकाम करणे १० लाख, राशीन पेठ येथे बागडे मामा घर ते आजीनाथ कांबळे घर गटार व काँक्रीटीकरण करणे १० लाख, कुर्डुवाडी नगरपरिषद अंतर्गत अंबादास चौधरी ते राजू वाघ ते सचिन बागल ते करंजकर ते सचिन ढवळे घरापर्यंत गटार व रस्ता काँक्रीटीकरण करणे १० लाख, चव्हाण वस्ती ते गोरे वस्ती रस्ता करणे १० लाख, माढा नगरपरिषद अंतर्गत माढा- कुर्डुवाडी रस्ता ते दिलीप माळी घर आरसिसी पाईप इनलाईन व रस्ता करणे १० लाख, अकलूज नगरपरिषद अंतर्गत नवीन बाजारतळ फत्तेसिंह माने पाटील नगर येथील अंतर्गत रस्ते दुरुस्ती व डांबरीकरण करणे १० लाख, नातेपुते नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक ६ मधील सागर बिचुकले घर ते भवानी माता मंदिर ते नाला भूमिगत गटार करणे १५ लाख, प्रभाग क्रमांक १ मधील ड्रीमसिटी अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे २० लाख, प्रभाग क्रमांक १६ येथे अंतर्गत भूमिगत गटार व रस्ता करणे १० लाख, पंढरीनाथ राऊत ओढा ते ढगे वस्ती रस्ता करणे १० लाख, प्रभाग क्रमांक १७ मध्ये राजाभाऊ देशमुख ते सावकर चौक रस्ता करणे २० लाख, माळशिरस नगर पंचायत अंतर्गत ६१ फाटा ते नवनाथ देशमुख वस्ती रस्ता करणे १० लाख, माळशिरस नगरपंचायत क्षेत्रामध्ये व्यायामशाळा बांधणे ३० लाख, हिंदू स्मशानभूमी नूतनीकरण करणे १० लाख, वार्ड क्रमांक १३ पुणे पंढरपूर रोड ते काळे वस्ती मेडद हद्द रस्ता खडीकरण करणे १० लाख, प्रभाग क्रमांक ११ येथे शहा धारशी प्लॉट डॉ. दिलीप वाघमोडे हॉस्पिटल ते पोलीस स्टेशन पेव्हर ब्लॉक बसवणे व बंदिस्त गटार करणे १० लाख, वार्ड क्रमांक पाच येथील सिद्धार्थ नगर येथे धाईंजे गल्ली येथे अंतर्गत सिमेंट पाईपलाईन गटार करणे १० लाख, प्रभाग क्रमांक १ येथे हनुमान नगर रोड ते राशीद पठाण यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे १० लाख, चौगुले वस्ती येथील पुंडलिक कोळेकर वस्ती येथे बंडू कोळेकर वस्ती रस्ता करणे १० लाख, पंढरपूर रस्ता ते सद्गुरु दूध संकलन केंद्र ते महादेव मंदिर रस्ता करणे १० लाख, चौगुले वस्ती येथील मारुती मंदिर ते पाणंद रस्ता करणे १० लाख, ६० फाटा निवृत्ती पांडुरंग वाघमोडे वस्ती ते मेन कॅनल रस्ता मुरमीकरण डांबरीकरण करणे २० लाख, म्हाळुंग नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक पाच समाज मंदिर ते भगवान बापू चव्हाण ते रामदास चव्हाण रस्ता करणे १० लाख, वार्ड क्रमांक पाच येथे मुस्लिम समाज मंदिर बांधणे १० लाख, खंडोबा मंदिरासमोरील नगरपंचायत क्षेत्रात सभा मंडप बांधणे १० लाख, एनएच ९६५ ते विठ्ठल मंदिर पर्यंत रस्ता करणे १० लाख, नूरखान तांबोळी घर ते मनोज गायकवाड रस्ता काँक्रीटीकरण करणे १० लाख अशी एकूण ४ कोटी ३५ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!