महाराष्ट्र

रवळनाथचा सर्वसामान्यांच्या स्वप्नांना मूर्त स्वरुप देण्याचा व्यापक दृष्टीकोन- श्री. एम. एल. चौगुले

 सांगोला शाखा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

सांगोलाः रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीने वित्तीय संस्था म्हणून आदर्श निर्माण केला आहेच परंतू त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, रोजगार व सामाजिक या विविध क्षेत्रात सक्रीय योगदान देत आहे. रवळनाथच्या ग्राहक, सभासद यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणेच सेवा दिली जाते. सर्वसामान्यांच्या स्वप्नांना मुर्त स्वरुप देण्याचा व्यापक दृष्टीकोन सत्यात उतरविण्याचा प्रयत्न संस्थेच्या कार्यातून सातत्याने सुरु आहे, असे प्रतिपादन रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांनी केले.

श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीचे सांगोला शाखेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्याख्यान, अमृतमहोत्सवी व सेवानिवृत्त सभासद, यशवंत पाल्यांचा सत्कार व हळदी कुंकू समारंभ तसेच शिक्षक दिनानिमित्त महिला शिक्षिकेंचा सन्मान अशा संयुक्त कार्यक्रमप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून सोलापूर येथील जिव्हाळा मतिमंद मुलांची संस्थेच्या अध्यक्षा व प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. अस्मिता बालगावकर यांनी महिलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. शाखा चेअरमन प्रा. डॉ. डी. एन. काशीद, कार्यक्रमाच्या समन्वयक व शाखा सल्लागार प्रा.डॉ. सीमा गायकवाड, सी. सीमा घोंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. अस्मिता बालगावकर म्हणाल्या, सध्याच्या धावपळीच्या जगात व्यक्तीचे मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडत चालले आहे. त्यामुळे सामाजिक व कौटुंबिक स्तरावर अनेक गंभीर समस्या निर्माण होत आहेत. नैराश्य आणि ताणतणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्या शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे, मनमोकळा संवाद साधणे, स्वतःला वेळ देणे, छंद जोपासणे या कृतीमधून मानसिक आरोग्य उत्तम राहते यासाठी समाजात जनजागृती करायला हवी

याप्रसंगी श्री. सुभाषचंद्र गायकवाड, श्री. मल्लिकार्जुन घोंगडे, श्री. यशवंत शिंदे या अमृतमहोत्सवी सभासद व प्रा. डॉ. अर्जुन मासाळ, श्री. मच्छिद्र इंगोले, श्री. सुरेश मस्तूद, श्री. सिद्धेश्वर नवले, श्री. मारुती बोरकर या सेवानिवृत्त सभासदांचा तसेच कु. अंजली पवार, कु. आदित्य शिंदे या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी सत्कार स्विकारला. शिक्षक दिन व हळदी कुंकु समारंभाच्या निमिताने सांगोला परिसरातील महिला शिक्षिकेंचा वाण देऊन विशेष सन्मान करण्यात आला,

यावेळी शाखा चेअरमन प्रा. डॉ. डी. एन. काशीद यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, प्रा. डॉ. सीमा गायकवाड यांनी अतिथी परिचय करुन दिला. सौ. माधुरी जाधव व गौरी बेळगुद्री यांनी सुत्रसंचालन केले. सौ. शुभांगी घोंगडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास संचालक प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर, प्रा. डॉ. किरण पोतदार, श्री. महेश मजती व श्रीमती उमा तोरगल्ली, सीईओ श्री. डी. के. मायदेव, सौ. सविता चौगुले, सौ. सविता चौगुले, सौ. शुभांगी करोशे, संपदा चौगुले यांच्यासह रवळनाथचे सांगोला शाखा सल्लागार, शाखाधिकारी श्री. सुशांत जिजगोंडा व सभासद, ठेवीदार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

फोटोओळी : सांगोला शाखा वर्धापनदिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभप्रसंगी संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांनी मार्गदर्शन केले यावेळी डॉ. अस्मिता बालगावकर, शाखा चेअरमन प्रा. डॉ. डी. एन. काशीद, शाखा सल्लागार प्रा. डॉ. सीमा गायकवाड, सौ. शुभांगी घोंगडे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button