सांगोले नगरपरिषदेमार्फत कार्यालयीन ठेकेदार कर्मचारी यांची संगणकीय कामकाजाची कार्यशाळा संपन्न

सांगोले नगरपरिषदेमार्फत नगररिषदेतील कार्यालयीन ठेकेदार कर्मचारी यांची दि २७/५/२०२३ रोजी सुयश कॉम्प्यूटरर्स, वासूद रोड, सांगोला येथे संगणकीय कामकाजाची कार्यशाळा आयोजित करणेत आली होती.
त्यामध्ये सर्व ठेकेदार कर्मचा-यांना मा. मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सुयश कॉम्प्यूटरचे संचालक श्री एम.एस. इनामदार सर यांनी संगणक कामकाजा विषयी प्रशिक्षण दिले. त्यानंतर चाचणी परिक्षा घेण्यात आली. त्यामध्ये एकूण १७ कर्मचा-यांनी भाग घेतला. यावेळी कार्यालय अधिक्षक श्री कन्हेरे, कर निरीक्षक श्रीमती रसाळ मॅडम. सहा करनिरीक्षक श्री हाके, व आस्थापना विभागाचे श्री इमरान शेख यांनी कार्यशाळेचे आयोजन केले.