शालेय स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

महूद, ता. १८ : स्पेक्ट्रम टॅलेंट सर्च या स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा महूद अंतर्गत असलेल्या चव्हाणवाडी शाळेत नुकताच सत्कार करण्यात आला.
स्पेक्ट्रम टॅलेंट सर्च या स्पर्धा परीक्षेत महूद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मनस्वी अरुण नागणे हिने केंद्रस्तरीय उत्तेजनार्थ पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल चव्हाणवाडी शाळेचे मुख्याध्यापक धुळा सातपुते यांच्या हस्ते तिचा स्पेक्ट्रम परीक्षेचे मेडल,सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महिम या शाळेतील शौर्य सुनिल खांडेकर या विद्यार्थ्यांने केंद्रस्तरीय उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल केसकरवस्ती शाळेचे मुख्याध्यापक उमेश महाजन यांच्या हस्ते स्पेक्ट्रम परीक्षेचे मेडल,सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.तसेच मनस्वी नागणे या विद्यार्थिनीला वर्गशिक्षिका वंदना पाटणे मॅडम तर शौर्य खांडेकर या विद्यार्थ्याला वर्गशिक्षिका मनीषा खबाले यांचे मार्गदर्शन लाभले.
वंदना पाटणे व मनीषा खबाले यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमास धुळा सातपुते,उमेश महाजन,विठ्ठल तांबवे, सुनील खांडेकर, कल्पना चव्हाण,अनुसया गोसावी,संगीता विभुते आदी उपस्थित होते. विठ्ठल तांबवे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.