मा.आ.दीपक आबा साळुंखे- पाटील यांच्या प्रयत्नातून जवळा मंडल मधील विविध योजनांच्या पेन्शन संदर्भात कॅम्प संपन्न.

जवळा(प्रशांत चव्हाण) मा.आ.दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नातून जवळा मंडलातील जवळा तरंगेवाडी बुरंगेवाडी आगलावेवाडी भोपसेवाडी येथील जे अपंग, निराधार, विधवा श्रावणबाळ अशा योजनांच्या पेन्शन संदर्भात मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी जवळा ग्रामपंचायत पटांगण येथे कॅम्प संपन्न झाली. त्यामध्ये बंद झालेली 15 प्रकरणे नवीन 91 प्रकरणे व ज्यांची हयात प्रमाणपत्र नाहीत अशी 40 प्रकरणे अशी एकूण 146 प्रकरणे जमा करण्यात आली.
यावेळी संजय गांधी निराधार योजना अधिकारी श्री.जोंधळे साहेब यांनी लोकांच्या अडी अडचणी समजून त्यांना योग्य मार्गदर्शन केले. मा.आ.दीपक आबा साळुंखे-पाटील यांनी अपंग,निराधार,वयोवृद्ध लोकांसाठी कॅम्प आयोजित केल्यामुळे लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे यासाठी जवळा गावच्या सरपंच सौ.सुषमाताई घुले- सरकार तंटामुक्त अध्यक्ष श्री.अरुण भाऊ घुले-सरकार उपसरपंच श्री. नवाज खलिफा,श्री.सुनील आबा साळुंखे श्री.चाकू पाटील सर श्री.प्रशांत साळुंखे सर,श्री.संजय साळुंखे,श्री.मनोज धुमाळ,श्री. दीपक कांबळे सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी श्री.रसाळ भाऊसाहेब,पोलीस पाटील श्री.अतुल गयाळी, मंडल अधिकारी श्री.जाधव भाऊसाहेब,तलाठी श्री.गायकवाड भाऊसाहेब व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी योजनांचा लाभ घेण्यासाठी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.