नाझरे येथील वीरभद्र मंदिरात मन्मथ स्वामी महाराजांची जयंती साजरी

महान शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज यांनी सोळाव्या शतकात लिंगायत धर्माला लागलेली मरगळ दूर करून धर्माला पुनर्जीवित केले व गुरु, लिंग, जंगमात ऐक्य दाखवून भक्तीचा मार्ग दिला अशा या राजा अर्थात संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज यांची जयंती वीरभद्र मंदिर नाझरे ता . सांगोला येथे मोठ्या उत्साहात करण्यात आली. यावेळी मनमत माऊलीच्या प्रतिमेचे पूजन शिवभक्त योगीराज शेटे व सुकन्या शेटे या उभयंताच्या हस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी वीरभद्र भजनी महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, पाळणा सोहळा, महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी शिवभक्त रविराज स्वामी, शंकर स्वामी, शरद स्वामी, शिवाजी स्वामी, सिद्धेश्वर झाडबुके, अशोक पाटील, मुकुंद पाटील, नंदकुमार रायचुरे, महालिंग पाटील, प्रवीण पाटील, सुभाष पाटील, राजू खोकले, रविराज शेटे, बाळासो पाटील, महिला भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.