जवळे(प्रशांत चव्हाण) सालाबाद प्रमाणे जवळे (देशमुख वस्ती) येथील श्री.चंद्रकांत नानासो देशमुख गुरुजी यांच्या निवासस्थानी धर्मनाथ बीज सोहळा शुक्रवार दि.31 जानेवारी 2025 रोजी मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सदरच्या कार्यक्रमात नवनाथ ग्रंथाचे पारायण हा मुख्य विषय असतो.ग्रंथ समाप्तीनंतर दुपारी4 ते सायं 6 वाजेपर्यंत प्रवचन व भजन ह.भ. प. श्री.बंडू सुतार आणि सहकारी यांनी सादर करून भाविक भक्तांची मने जिंकली.सायं.6 वा श्री.सद्गुरु कचरनाथ बाबांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून आरती करण्यात आली.
याप्रसंगीश्री.साहेबरावदादा पाटील,सौ.रूपमतीदेवी साळुंखे- पाटील,श्री.आप्पासाहेब दादा देशमुख.श्री.पाटील सर,श्री.राजेंद्र सावंत,श्री.आनंदराव पवार गुरुजी,श्री.घाडगे गुरुजी,श्री.बसू गयाळी,श्री.अशोक कळसाईत श्री.केदार सर,श्री.अमोल अंबरे साहेब तसेच कडलास, वासूद,आलेगाव,चव्हाणवाडी,मानेगाव बनाळी बेडग या गावातील तसेच कुमठे,पाटण,डफळापुर,जवळे वेळापूर या दरबारातील बाबांचे महिला व पुरुष भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शेवटी आभार मानून आलेल्या सर्वांना देवाच्या पंगतीत जेवण केल्याचे समाधान लाभले.