सांगोल्यातील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ येथे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय मंगळवेढा अंतर्गत निर्भय पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी कविता सावंत, अमोल राऊत यांनी वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव निलकंठ शिंदे सर उपस्थित होते.
यावेळी निर्भया पथकातील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनी निर्भया पथकाचे कार्य समजावून सांगितले शाळेत , आपल्या परिसरात जर आपणास कोणी जाणीवपूर्वक त्रास देत असेल तर त्याची कल्पना आपल्या शाळेतील शिक्षक , पालकाना किंवा जवळच्या पोलिस स्टेशनला कळविण्याचे आवाहन केले अथवा शाळेतील तक्रार पेटीत द्यावी असे सांगुन महीला व मुलींसाठी रात्री अपरात्री पोलिसांची मदत लागली तर 112 हा मोफत मदत क्रमांक डायल करून मदत घेण्याचे आवाहन केले यावेळी बॅड टच ,गूड टच असे स्पर्श विद्यार्थिनीना समजावून सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन व्ही शिंदे सर यांनी केले या कार्यक्रमास प्रशलेतील विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.