नाझरा(वार्ताहर):- सांगोला तालुक्यातील चिणके येथील अशोक दत्तू पाटील(वय-62) यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. रविवारी पहाटे चिणके येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या रक्षा विसर्जनाचा विधी मंगळवारी सकाळी पावणे आठ वाजता चिणके येथील स्मशानभूमीत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून समजते.