महाराष्ट्र
सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न
सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या इ. 1ली ते 4थी च्या विद्यार्थ्यांची (सोलापूर दर्शन)शैक्षणिक सहल शनिवार दि.1/2/2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे व उपस्थित पालकांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले व सर्व बस सोलापूर दर्शनासाठी रवाना झाल्या. सुरूवातीला सर्व विद्यार्थ्यांनी श्रीसिध्दरामेश्वराचे दर्शन घेतले यानंतर वीरतपस्वी मठामध्ये वीरतपस्वी महाराजांचे दर्शन घेतले. येथील वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एक हजार आठ शिवलिंगाच्या प्रतिकृतींचे दर्शन घडते. पुढे ही सहल विज्ञान केंद्र येथे पोहचली या ठिकाणी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी स्नेहभोजनाचा स्वाद घेतला. यानंतर विज्ञान केंद्रामध्ये थ्री डी चा आनंद घेतला. त्याचबरोबर द्रवस्फटीक काच, आभासी स्वरमंडळ, न्युटनचा झोका, होलोग्राम,तारामंडळ,वस्त्रनिर् मितीतील विविध टप्पे इ. माहिती घेतली.यानंतर परतीच्या प्रवासात मंगळवेढा येथील रिध्दी सिध्दी गणेश मंदिरामध्ये श्री गणेशाचे दर्शन घेऊन ही सहल विद्यालयात सुखरूप पोहोचली.
ही सहल यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका कु. शिल्पा ढाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख कु. पल्लवी थोरात, युवराज केंगार यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.